‘ओवळी’ म्हणजे ‘बकुळी’. लेखिकेच्या मनाच्या ओवरीतील ही ओवळी म्हणजे हळुवार भावनांचा सुंदर निसर्गआविष्कार. ही मालवणी मुलखाची एक वेगळी धाटणी असलेली साहित्यकृती आहे
'ओवळी' म्हणजे मालवणी मुलखातील मुलुखगिरी आहे. निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण, निरीक्षणातून जीवनचिंतन, तत्त्वचिंतन व अभिव्यक्तीतील अचूकता यामुळे त्यांच्या लेखनाला एक धार प्राप्त होते, ती वाचकांच्या काळजात आरपार जाते. विद्या प्रभू विषयाचा तोल आणि ताल त्या सांभाळतात. त्यातून एक भावसरगम तयार होते. ही मालवणी मुलखाची एक वेगळी धाटणी असलेली साहित्यकृती आहे.......